मंगळवार, २४ डिसेंबर, २०१३

ह भ प अश्विनीताई म्हात्रे घोडपदेवचे कीर्तन

ASHOK BHEKE

               ह भ प अश्विनीताई म्हात्रे घोडपदेवचे कीर्तन 


घोडपदेव विभागात स्थानिक कॉंग्रेस नेते श्री साहेबराव ( भैस )देशमुख हे दरवर्षी नामसंकीर्तन महोत्सव आयोजित करतात. तन मन धन सारे त्यांचेच. सोबत त्यांचे पाठीराखे मदतीला असतात. ह भ प नामदेव महराज घोलप याची सर्व जबाबदारी उत्साहाने खांद्यावर घेतात अन पार पाडतात. हु कि चू करीत नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या गोड स्वभावामुळे  किवा गोड गायकीमुळे  त्यांनी टाळकरी,विणेकरी, मृदुनमनीचा ताफा जमविला आहे त्यामुळे त्यांचा कोणताही कार्यक्रम चांगलाच होतो. दिनांक २३. १२. १३ रोजी ह भ प वनिताताई पाटील यांच्या सुमधुर कीर्तनाने श्रोत्यांना जागच्या जागी खिवून ठेवले. अभंगासोबत, गवळण घेतल्यामुळे श्रोत्यांना तंद्री लागली नाही. 

दिनांक २४. १२. १३ रोजी ह भ प  अश्विनीताई म्हात्रे यांचे कीर्तन होते. या देखील अश्याच कीर्तनकार . कीर्तनात वातावरण धार्मिक कसे करावे . ते यांना पुरेपूर ठाऊक. अनेक दाखले देत ते समाज प्रबोधन करतात. दाखले देत असताना या ताईंनी आसारामबापूंचा दाखला दिला. जे वृत्तपत्रातून आलेले आहे, प्रसार माध्यामानी प्रसिध्द केले आहे या अनुषगानी कीर्तनकार बोलल्या . श्रोते समोर बसलेले असतात असे नव्हे . ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर ते घरी बसून ऐकत असतात. त्या मध्ये एक आसाराम भक्ताला ताईंची टीका अत्यंत तिखट लागली.  अंगाची लाही लाही झाली. कीर्तन संपल्यानंतर सदर भक्तांनी सरळ अश्विनीताईना जाब विचारला आसाराम बापूंच्या  विषयी  भलते सलते  बोलता कामा नये. अन्यथा खपवून घेतले जाणारन  नाही  ….? 

 काय भक्त असतात ….! सुंभ जाळून खाक झाला तरी देखील यांचा पिळ मात्र कायम….!

अखेर अश्विनीताई मात्र सौजन्याने अनेक दाखले देत भर रस्त्यात सदर भक्तांचे समाधान करण्याचा प्रयत्न
केला पण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच ………! विचारांची लढाई विचारणे लढणे योग्य . विचार नाही पटले तर अनेक पद्धतीने आपण आपले मत प्रकाशित करू शकतो . मी या हरिपाठ कीर्तन नामसंकीर्तन महोत्सवात नेहमीच अग्रेसर आहे . माझ्या गळ्यात तुलशिमाळ नाही . मी धार्मिक आहे परंतु कोणत्याही देवाला वाहून घेतले नाही. जे  स्व्यमघोषित संत महंत धार्मिक विचार प्रकट करीत आहेत त्यात मुख्यत: ज्ञांनेश्वरी, तुकोबाची गाथा असो वा रामायण महाभारत असो, या ग्रंथाच्या आधारे विचार प्रकट करतात. हे या भक्तांना कोणी सांगावे.शेवटी पांडुरंगा चरणी लीन एके दिवशी व्हावयाचे ठरलेले आहे  



  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा